राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकता संशोधन कायदा यांना विरोध करणार्‍या सदफ जाफर यांना काँग्रेसकडून उत्तरप्रदेशमध्ये उमेदवारी

काँग्रेसकडून दुसरी अपेक्षा तरी कुठली असू शकते ? जनतेनेच आता काँग्रेसला तिची जागा दाखवून दिली पाहिजे ! – संपादक

सदफ जाफर

लक्ष्मणपुरी (लखनौ) – उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने १२५ उमेदवारांची पहिली सूची घोषित केली असून त्यामध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकता संशोधन कायदा यांच्या विरोधात आंदोलन करणार्‍या सदफ जाफर यांचाही समावेश आहे. हे आंदोलन करतांना त्यांना लक्ष्मणपुरी येथून अटक करण्यात आली होती. हे कायदे राष्ट्रहिताचे असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत होते; परंतु काँग्रेसने त्यांस कडाडून विरोध केला होता. काँग्रेसने उमदेवारांच्या या पहिल्या सूचीत ५० महिलांना स्थान दिले आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांचाही समावेश आहे.