पाकमध्ये बळजोरीने केलेल्या धर्मांतराच्या प्रकरणांत ७० टक्के प्रमाण हे हिंदु अथवा ख्रिस्ती मुलींचे !

  • शेजारील इस्लामी देश पाकिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्यांक हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी भारतातील आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी काहीच केले नाही, हे लज्जास्पद ! – संपादक
  • केवळ पाक नव्हे, तर जगभरातील हिंदूंच्या हितांचे आणि जीविताचे रक्षण होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय आहे अन् त्यासाठी प्रयत्न करणे, हे सर्व भारतीय हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जाते. तेथील एका वृत्तपत्राने प्रसारित केलेल्या अहवालानुसार  धर्मांतर करण्यात आलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील लोकांमध्ये ७० टक्के प्रमाण हे अल्पवयीन मुलींचे आहे. ‘दी नेशन’ या वृत्तपत्रानुसार वर्ष २०२० मध्ये ही संख्या १५ होती, तर वर्ष २०२१ मध्ये ही संख्या चौपटीहून अधिक म्हणजे ६० हून अधिक झाली आहे. पाकमध्ये प्रत्येक वर्षी १ सहस्र मुलींचे अपहरण होऊन त्यांच्यावर धर्मांतर करण्याची बळजोरी केली जाते. नंतर या प्रकरणांना दाबले जाते. या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार अल्पसंख्यांकांचे धर्मांतर रोखण्यासाठी देशात कोणताही कायदा अस्तित्वात नाही. (ज्या देशाची राज्यघटना ही इस्लामवर आधारित आहे, ती जगाला ‘दार्-उल्-इस्लाम’ (सारे जग इस्लाममय करू !) करण्यासाठी कटीबद्धच असणार ! त्यामुळे पाकमधील पीडित अल्पसंख्यांकांच्या धर्मांतरावर बंदी घालण्यासाठी कायदा होणे कदापि शक्य नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)

१. नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणामध्ये १३ आणि १९ वर्षीय हिंदु मुली अन् एक ख्रिस्ती मुलगी अशा तिघींचे धर्मांतर करून त्यांचे ४० वर्षीय मुसलमान पुरुषांशी लग्न लावले गले.

२. अहवालानुसार पाकमध्ये अल्पसंख्यांक मुलींचे अपहरण, बलात्कार आणि तत्सम प्रकार वाढत चालले आहेत.