|
पुत्तूर (कर्नाटक) – कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील पुत्तूर शहरात हिंदु मासेविक्रेत्यांवर तलवारींनी आक्रमण केल्याच्या प्रकरणी जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) २ कार्यकर्त्यांना पोलिसांनी येथे अटक केली. सरफुद्दीन (३१ वर्षे) आणि महंमद इरफान (२४ वर्षे) अशी या गुंडांची नावे असून त्यांना हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
६ डिसेंबर २०२१ या दिवशी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे कार्यकर्ते सरफुद्दीन आणि महंमद इरफान यांनी हिंदु मासेविक्रेते अशोक उर्फ अनिल कुमार आणि त्याचा मोठा भाऊ मोहनदास, तसेच त्यांचा एक ग्राहक महेश यांच्यावर तलवारींनी आक्रमण केले होते.
हा भाग धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असून अनेक आक्रमणांच्या घटनांमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचा हात आहे. काही दिवसांपूर्वी ‘पी.एफ्.आय्.’च्या कार्यकर्त्यांनी दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील उप्पीनंगडी येथे पोलिसांवर आक्रमण कले होते. त्यावेळी ‘पी.एफ्.आय्.’वर राज्यात बंदी घालण्यात यावी’, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने कर्नाटक सरकारकडे केली होती. (सनातनवर बिनबुडाचे आरोप करून बंदीची मागणी करणारे धर्मनिरपेक्षतावाले, साम्यवादी आणि बुद्धीजीवी ‘पी.एफ्.आय.’च्या आतंकवादी कारवायांविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)