सांगली – राज्यात, तसेच सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्ह्यातील इयत्ता १ ते ८ वीपर्यंतच्या सर्व शाळा १० जानेवारीपासून पुढील आदेशापर्र्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बंद ठेवण्यात आलेल्या शाळा ‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू ठेवण्याविषयी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेकडील शिक्षण विभाग यांनी सर्व शाळांना त्यांच्या स्तरावरून कळवले आहे.