अपघातात मृत्यू झालेल्याचा भ्रमणभाष चोरून त्याचा वापर करणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित

चोर पोलीस !

अशा भुरट्या चोर्‍या करणार्‍या पोलिसांना निलंबित नाही, तर नोकरीतून बडतर्फ करून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच या अधिकार्‍याने अशा प्रकारचे किती गुन्हे केले असतील ? याचाही शोध घेतला पाहिजे ! – संपादक

‘केरळमधील पोलीस उपनिरीक्षक ज्योती सुधाकर यांना रेल्वेच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या एका प्रवाशाचा भ्रमणभाष संच चोरल्याच्या प्रकरणी निलंबित करण्यात आले. अरुण जेरी हे प्रवासी १८ जून २०२१ या दिवशी अपघातात मृत्यूमुखी पडले होते. त्या वेळी घटनास्थळी त्यांचे नातेवाईक पोचले असता त्यांना जेरी यांचा भ्रमणभाष आणि काही वस्तू गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याविषयी केरळचे पोलीस महासंचालक, तसेच सायबर सेल पोलीस यांच्याकडे तक्रार केली. सायबर सेलने केलेल्या अन्वेषणात या भ्रमणभाषचा वापर पोलीस उपनिरीक्षक ज्योती सुधाकर करत असल्याचे समोर आले.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.