‘ऑनलाईन’ धर्मसत्संगातील एका धर्मप्रेमी शिक्षिकेने तिच्या शाळेत ख्रिसमस साजरा न करण्याविषयी दाखवलेले धाडस !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – भारतामध्ये शिक्षित हिंदूंमध्ये स्वत:ला धर्मनिरपेक्ष दाखवण्याची स्पर्धा किती मोठ्या प्रमाणात रूजली आहे, याचे ज्वलंत उदाहरण आमच्या पब्लिक स्कूलमध्ये पहायला मिळते. हिंदूबहुल भाग, हिंदूबहुल विद्यार्थी आणि हिंदु शिक्षक असतांना आमच्या शाळेत प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा केला जातो. या वर्षी ‘सिक्रेट (गुप्त) सांताक्लॉज’साठी आम्हा सर्व शिक्षकांना भेटवस्तू आणण्यास सांगितले. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली करत असलेली साधना आणि गुरुकृपा यांमुळे ‘हे करायचे नाही’, एवढे मला कळत होते.

त्यामुळे मी आमच्या मुख्याध्यापिकांना जाऊन विचारले, ‘‘हे आवश्यक आहे का ?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘तुम्हाला काय अडचण आहे ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘यामध्ये सहभागी न होण्यासाठी माझ्याकडे १०० कारणे आहेत. तुम्हाला ऐकायची इच्छा असेल, तर मी सांगू इच्छिते.’’ मी कारणे सांगणे चालू केले; परंतु ३ कारणे ऐकल्यावरच त्या म्हणाल्या, ‘‘ठीक आहे, तुम्ही करू नका; पण तुम्ही ख्रिश्चॅनिटीला मानत नाही का ?’’ मी म्हणाले, ‘‘मला कुणाच्या पंथाविषयी कोणतीही अडचण नाही; पण त्यांनी ते त्यांच्या घरी आणि चर्चमध्ये करावे अन् माझा यावर विश्वास नाही.’’

मुख्याध्यापिकेला सांगितलेली ३ सत्य !

१. हा युरोपियन लोकांचा धर्म आहे, ज्यांनी माझ्या देशाला लुटले आणि गुलाम बनवले. ‘गोवा इंक्विझिशन’ (गोव्यात पोर्तुगिजांनी हिंदूंवर केलेले अत्याचार) कुणी हिंदू कसे विसरू शकते ?

२. हिंदूंचे एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात येत आहे की, नुकतेच आंध्रप्रदेशमधील एका पाद्र्याने म्हटले, ‘भारताला २ भागांत विभागून एक ख्रिस्त्यांना दिला पाहिजे.’ तेथे मंदिरांचा विध्वंस करणे चालू आहे.

३. केरळची स्थिती काय झाली आहे ? तेथे आमचे (हिंदूंचे) अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंना लढावे लागत आहे.

माझ्या समवेत अन्य अनेक सहकार्‍यांनी त्यात सहभाग घेतला नाही. आम्हाला ‘रेबल’ (विद्रोही) आणि ‘रॅडिकल’ (मूलतत्त्ववादी) संबोधण्यात आले. काही लोक ख्रिसमसमध्ये सहभागी झाले; परंतु ते आनंदी नव्हते. त्यांनी मला सांगितले की, आम्ही कधीच या विषयावर अशा प्रकारे विचार केला नव्हता. विचारशील लोकांमध्ये एक चिंतनाची लहानशी ठिणगी लावली आहे. बाकी गुरुकृपा !

– एक धर्मप्रेमी शिक्षिका