प्रशासनाने वेळीच समस्या सोडवण्याकडे लक्ष दिल्यास आधुनिक वैद्यांवर अशी वेळ येणार नाही ! – संपादक
पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वाय.सी.एम्.) रुग्णालयात ‘बीव्हीजी इंडिया’ गटात या ठेकेदार आस्थापनाच्या वतीने कंत्राटी तत्त्वावर काम करणारे आधुनिक वैद्य (डॉ.) महेंद्र चाटे यांनी अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. २ मासांपासून वेतन मिळत नसल्याने तसेच वेतन कपात करून सुटीही दिली जात नाही. यामुळे डॉ. चाटे त्रस्त झाले होते. या नैराश्यातून त्यांनी महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर १७ डिसेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता आत्महत्येचा प्रयत्न केला.