तृणमूल काँग्रेसशासित बंगालचा आतंकवादी चेहरा !

प्रतिकात्मक छायाचित्र

१. तृणमूल काँग्रेसचे गुन्हेगारी स्वरूप

ऑक्टोबर २०१३ मध्ये बंगालच्या बर्दवानच्या जवळ खग्राहट येथे बाँबस्फोट झाले होते. हे स्फोट तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयामध्ये झाले होते. त्याच्या वरच्या मजल्यावर बांगलादेशी घुसखोरांनी आश्रय घेतला होता. स्फोटामध्ये एक ठार झाला, तर दुसरा पूर्णत: घायाळ झाला. स्थानिक पोलिसांना तेथे पुष्कळ संख्येने विस्फोटक मिळाले आणि त्यांनी ते निकामी केले. खरेतर स्थानिक पोलिसांनी ही घटना तृणमूल काँग्रेसशी संबंधित असल्याने त्यांनी ते सर्व पुरावे नष्ट केले.

२. मदरसे म्हणजे आतंकवादी बनवण्याचे कारखाने !

‘रॉ’च्या गुप्तहेरांनी बंगालच्या नदिया, मुर्शिदाबाद, बर्दवान आणि बीरभूम जिल्ह्यातील मदरशांवर धाड टाकली. त्या वेळी त्यांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट आढळली, ती म्हणजे मदरशांमध्ये ‘जिहाद’चे शिक्षण दिले जात होते. काही मदरसे तर छुपे युद्ध आणि हत्यार चालवण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे त्यांनी पाहिले.

३. हिंदुविरोधी आणि भारतविरोधी जिहादी कारवायांचे केंद्र मदरसे !

इंग्रजी दैनिक ‘डीएन्ए’ने ऑक्टोबर २०१३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार सिमुलिया (बर्दवान) आणि लालगोला (मुर्शिदाबाद) येथील मदरसे केवळ धर्मांध महिलांना आतंकवाद पसरवण्याच्या विविध क्लृप्त्या शिकवतात. त्यांना बुरख्याचा अपलाभ घेऊन हत्यार आणणे-नेणे याच्या पद्धतीही समजवल्या जातात.

गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार षड्यंत्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये आतंकवादी बंगालच्या नदिया, मालदा आणि मुर्शिदाबाद या जिल्ह्यांना बांगलादेशामध्ये सामील करू इच्छितात. ‘जमात-उल्-मुजाहिदीन-बांगलादेश’ (जमुबा) या जिहादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी

भारतातील स्थानिक गरीब तरुणींशी विवाह करून त्यांना मुसलमान बनवण्याचा फतवा काढला आहे. त्यानंतर त्या तरुणींना बाँब सिद्ध करण्याची आणि आधुनिक हत्यारे चालवण्याची शिक्षा दिली जाते. साजिद, ताल्हा शेख, नसिरुल्ला आणि कौसर या ४ धर्मांध आतंकवाद्यांनी स्थानिक हिंदु मुलींना जाळ्यामध्ये फसवून विवाह केला आहे. ते चारही जण पत्नींसह पसार (फरार) झाले आहेत. सुरक्षायंत्रणांना बर्दवान जिल्ह्यात १३ घटनांची अशी माहिती मिळाली आहे की, ज्यामध्ये बांगलादेशी धर्मांध आतंकवाद्यांनी हिंदु मुलींशी विवाह केला आहे.

४. बांगलादेशी घुसखोरांनी आसामसह संसदेत निवडून येणे

आसामचा ‘ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट’ हा पक्ष बांगलादेशी घुसखोरांचा अर्थात घुसखोरांसाठीच आहे. आसाम विधानसभामध्ये या पक्षाचे १५ आमदार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्येही या पक्षाने २ जागा जिंकल्या. त्यांचे संबंध आतंकवाद्यांशी जोडलेले आहेत. आसामच्या ‘सेक्युलरवादी’ सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनीही राज्यातील आतंकवादाच्या स्थितीवर चिंता दर्शवली आहे. गुप्तचर यंत्रणांचे अनुमान आहे की, बंगालच्या सीमावर्ती ७ जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त आसामामध्येही ‘जमात-उल्-मुजाहिदीन-बांगलादेश’ (जमुबा)चे आतंकवादी घुसले आहेत.

(साभार : मासिक ‘पाथेय कण’, नोव्हेंबर २०१४)

(सद्यःस्थितीत बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांमुळे आणि अन्य जिहादी संघटनांमुळे धर्मांधांच्या देशविघातक कारवाया वाढलेल्या आहेत. ते रोखण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायद्यासह राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची प्रक्रिया प्रभावीपणे राबवणे किती आवश्यक आहे, हेच दिसून येते ! – संपादक)