|
तक्रार करूनही फरीद आलम यांनी कारवाई केली नसेल, तर ते गंभीर आहे; मात्र झारखंडमध्ये ढोंगी निधर्मीवादी झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने हिंदुत्वनिष्ठांच्या धर्मांधांकडून झालेल्या हत्यांचे योग्य अन्वेषण होण्याची शक्यता अल्प आहे ! – संपादक |
रांची (झारखंड) – येथे विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी मुकेश सोनी यांच्या हत्येच्या प्रकरणी खलारी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरीद आलम हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सोनी यांच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यांनी या सदंर्भातील तक्रार पोलीस अधीक्षक नौशास आलम यांच्याकडे केली आहे. तसेच यात युनूस अंसारी आणि प्रिंस खान या दोघांचीही नावे आरोपी म्हणून देण्यात आली आहेत.
झारखंड में VHP नेता मुकेश सोनी की हत्या में परिजनों ने SHO फरीद आलम को साजिशकर्ता बताया है। यूनुस अंसारी और प्रिंस खान के भी नाम लिए गए हैं।https://t.co/ncTjCtqU2d
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 18, 2021
१. सव्वा वर्षांपूर्वी महावीरनगरातील स्मशानाच्या भूमीवर युनूस अंसारी आणि प्रिंस खान यांनी अतिक्रमण केले होते. त्यास सोनी यांनी विरोध केला होता. त्या वेळी युनूस अंसारी आणि प्रिंस खान यांनी विरोध करणारे मुकेश सोनी यांना ‘याचे परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी दिली होती, असे या पत्रात म्हटले आहे.
२. या प्रकरणी सोनी यांना सातत्याने धमक्या मिळत होत्या. याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरीद आलम यांना देण्यात आली होती. तरीही त्यांनी कारवाई केली नाही. ‘युनूस अंसारी आणि प्रिंस खान हे दोघेही अवैधरित्या शस्त्रांची विक्री करतात आणि त्याला फरीद आलम यांचे समर्थन आहे’, असे या पत्रात म्हटले आहे.