बेंगळुरू येथील श्री. नागराज निंगप्पा यांच्याकडून ‘नेटवर्किंग’ (संगणकांची आंतर जोडणी) सेवा शिकतांना आणि ते रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. वेळेचे पालन करणे
अ. ‘श्री. नागराज निंगप्पा प्रतिदिन पहाटे ५ वाजता उठून नामजप आणि योगासने करतात.
आ. त्यांची कार्यालयासाठी घरातून निघण्याची वेळ ठरलेली आहे. ते कार्यालयात नेहमी वेळेच्या ५ मि. आधी उपस्थित असतात.
२. इतरांची काळजी घेणे
आम्ही तीन साधक रामनाथी आश्रमातून बेंगळुरूला त्यांच्याकडे ‘नेटवर्किंग’ शिकण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी ‘आमचे जेवण, निवास इत्यादी व्यवस्थित होत आहे ना ?’, याकडे त्यांचे लक्ष असायचे.
३. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे गांभीर्य
दादा रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्यासाठी आले होते. त्या वेळी प्रक्रिया लवकर शिकण्यासाठी ते प्रयत्न करायचे. ‘माझ्या काही चुका झाल्या, तर मला सांगा. मी त्यावर प्रयत्न करीन’, असे ते म्हणायचे.
४. अल्प अहंभाव
दादा ‘सिस्को’ या मोठ्या आस्थापनात मोठ्या पदावर आहेत, तरीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात अहं जाणवत नाही. ते सर्व वयोगटातील व्यक्तींशी मोकळेपणाने आणि आदराने बोलतात.
५. भाव
अ. ‘आम्ही ‘नेटवर्किंग’ लवकर शिकावे’, यासाठी ते विविध प्रकारे आम्हाला समजावून सांगत. ‘आम्ही लवकर शिकून त्याचा गुरुकार्यासाठी लाभ व्हावा’, असा त्यांचा भाव असायचा.
आ. नागराज दादा म्हणतात, ‘‘मला गुरुदेवांच्या कृपेमुळे योग्य दिशा मिळाली, नाही तर मी मायेत भरकटत गेलो असतो.’’
इ. रामनाथी आश्रमातून घरी जातांना ते ध्यानमंदिरातील देवतांच्या मांडणीचे छायाचित्र घेऊन गेले. या माध्यमातून ‘मला आश्रमाची आठवण येईल’, असा त्यांचा विचार होता.
६. त्यागी
अ. त्यांनी ‘नेटवर्किंग’ संदर्भातील उपयुक्त साहित्य अर्पण केले आहे.
आ. ते रहातात, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठी पेठ (मार्केट) आहे. ‘तेथील काही वस्तू आवश्यक असल्यास सांगा. मी घेऊन पाठवतो. तेवढे माझे अर्पण होईल’, असे ते आम्हाला म्हणाले.’
– श्री. संदीप जगताप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१५.३.२०१८)