पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार
‘अनेक वेळा काही अहिंदु धार्मिक द्वेषामुळे आणि काही हिंदु अज्ञानामुळे म्हणतात, ‘‘हिंदु धर्मात अनेक व्रत-उत्सव आणि धार्मिक सण आहेत, जे आम्हाला निरुपयोगी वाटतात.’’ खरे तर हिंदु धर्मात वर्षाच्या दोन-तृतीयांश कालावधीत कोणते ना कोणते व्रत-उत्सव किंवा धार्मिक सण येण्यामागे एक अतिशय गुढ कारण आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीला मोह आणि माया यांचे बंधन तोडून साधनेसाठी वेळ काढणे फार कठीण आहे; परंतु आपल्या ऋषिमुनींना हे माहीत होते की, मानवी जीवनाचे मूळ ध्येय ईश्वरप्राप्ती आहे; म्हणून एखाद्या व्यक्तीने वर्षाच्या दोन तृतीयांश कालावधीत देव आणि धर्म यांसाठी काही प्रयत्न केले, तर गृहस्थाश्रमातील २५ वर्षे संपेपर्यंत तिच्यात ईश्वर आणि साधना यांच्याबद्दल नक्कीच प्रेम निर्माण होईल, ज्याद्वारे ती व्यक्ती वानप्रस्थाश्रमात जाण्यास सहज प्रवृत्त होईल. एखाद्या व्यक्तीला साधना करण्यासाठी प्रवृत्त करण्याइतके सूक्ष्म चिंतन इतर कोणत्या धर्मात करण्यात आले आहे का ?’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ (१५.११.२०२१)