भगवान श्रीकृष्णाची भक्ती करण्यासाठी महिला पोलीस अधिकारी भारती अरोरा यांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती !

आज ‘पोलीस म्हणजे भ्रष्ट व्यक्ती’ अशी ओळख निर्माण झाली असतांना स्वेच्छा निवृत्ती ऐवजी भगवान श्रीकृष्णाच्या नामजपासह पोलीस खात्यातील पोलिसांना भ्रष्टाचारापासून मुक्त, कार्यक्षम आणि साधक केले असते, तर समष्टी साधना होऊन श्रीकृष्णाची प्राप्ती लवकर झाली असती ! – संपादक

पोलीस अधिकारी भारती अरोरा

अंबाला (हरियाणा) – भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी भारती अरोरा यांना हरियाणा सरकारने स्वेच्छा निवृत्ती घेण्यास अनुमती दिली आहे. त्यांनी पुढील आयुष्य भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये घालवण्यासाठी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्यांनी  यासाठी सरकारकडे केलेल्या अर्जामध्येही असाच उल्लेख केला होता. भारती अरोरा यांचे पती फरीदाबादचे पोलीस आयुक्त आहेत.