हिंगोली येथे चोरट्यांनी वैद्यकीय अधिकार्‍याचे घर फोडून २ लाख ८४ सहस्र रुपयांचा माल पळवला !

हिंगोली – शहरातील शासकीय रुग्णालयाच्या परिसरात रहात असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी मेघा सुळे यांचे घर फोडून चोरट्यांनी २ लाख ८४ सहस्र रुपयांचा माल पळवला आहे. ही घटना २१ नोव्हेंबर या दिवशी घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात २२ नोव्हेंबर या दिवशी गुन्हा नोंद झाला आहे. (शासकीय रुग्णालयाच्या परिसरात सुरक्षारक्षकांचा वावर असतांनाही वैद्यकीय अधिकार्‍यांच्या घरात चोरी होत असेल, तर शहरातील सर्वसामान्य लोकांची घरे सुरक्षित असतील का ? – संपादक)