नांदेड येथे विवाहातील जेवणातून १०० जणांना विषबाधा !

नांदेड येथे विवाहातील जेवणातून विषबाधा

नांदेड – जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील दिग्रस (खु.) येथे झालेल्या एका विवाह समारंभात वरासह १०० जणांना जेवणातून विषबाधा झाली.

विवाह समारंभ पार पडल्यानंतर ४८ घंट्यांनंतर म्हणजे २३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांना उलट्या, मळमळ आणि डोकेदुखी असे त्रास होऊ लागले. त्यांच्यावर कंधार उपआरोग्य केंद्रात उपचार चालू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.