लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

एका वर्षापूर्वी धर्मांधाशी लग्न करणार्‍या हिंदु युवतीचा मृतदेह लटकवलेल्या अवस्थेत मिळाला

  • ‘लव्ह जिहाद’ च्या माध्यमातून हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा करा ! – संपादक
  • लव्ह जिहाद रोखण्यासाठी धर्मांधावर जरब बसेल अशी कारवाई करणे आवश्यक ! – संपादक
(प्रतिकात्मक छायाचित्र)

आग्रा (उत्तरप्रदेश) – शाहगंजमध्ये फईम खान उपाख्य अरमान याच्याशी निकाह (लग्न) करणार्‍या वर्षा रघुवंशीचा मृतदेह त्याच्या घरामध्ये लटकवलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच युवतीचे नातेवाईक आणि भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी पोचले. तेव्हा धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तेथे कडक बंदोबस्त ठेवला असून स्थिती नियंत्रणात आहे. या प्रकरणी पोलिसांनी वर्षाच्या सासरकडील ३ लोकांना अटक केली असून त्यांची चौकशी चालू आहे, तर फईम खान पसार झाला आहे.
चिल्लीपाडा येथील फईम खान आग्र्यामध्ये वाहन दुरुस्तीचे काम करतो. त्याने वर्षा रघुवंशी हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर १ वर्षांपूर्वी त्यांचा निकाह (लग्न) झाला होता. या लग्नाला वर्षाच्या नातेवाईंकांनी तीव्र विरोध केला होता; परंतु दोघेही सज्ञान असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकली नाही. लग्न झाल्यानंतर दोघांमध्ये नेहमी वाद होत असे. या त्रासाला कंटाळून वर्षाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले जाते.

पीडितेचा भाऊ दुष्यंत कुमार याला त्याच्या बहिणीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तो घटनास्थळी गेला. तेव्हा त्याला त्याची बहीण वर्षाचा मृतदेह फईमच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने विरोध केल्यावर पीडितेच्या सासरच्या लोकांनी त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर अचानक धर्मांधांनी त्यांच्यावर छतांवरून दगडफेक केली. यात भाजपचे नेते गौरव राजावत, गोविंद कुशवाह यांसह तिघेजण घायाळ झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत.


हिंदु युवतीचे अपहरण करून तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधाला अटक

उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ कायद्याची कठोरपणे कार्यवाही होणे आवश्यक ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथे हिंदु युवतीचे धर्मांतर करून तिच्याशी निकाह (लग्न) करण्याच्या प्रयत्नात असलेल्या धर्मांधाला अटक करण्यात आली. येथील खरेरू पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील कोट येथील शरीकुरहमान याने खोट्या नावाने एका युवतीशी मैत्री केली होती. त्यानंतर तिला त्याच्या गावाला पळवून नेले. त्यानंतर त्याने युवतीचे धर्मांतर करून तिच्याशी निकाह करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

शरीकुरहमान याने ज्या युवतीला पळवून आणले होते. तिच्या रहाणीमानावरून ती अन्य धर्माची असल्याचा लोकांना संशय आला होता. १२ नोव्हेंबर या दिवशी तो युवतीशी लग्न करण्याच्या प्रयत्नात होता. त्यापूर्वी गावकर्‍यांनी पोलीस अधीक्षकांना सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

पोलिसांच्या चौकशीत युवतीने तिचे हिंदु नाव सांगितले. तसेच ती बंगालच्या उत्तर २४ परगणा क्षेत्रातील खरदह येथील रहाणारी आहे, अशी माहिती दिली. शरीकुरहमान याने युवतीला ‘फेसबूक’च्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तेव्हा त्याने तिला त्याचे खोटे नाव सांगितले होते. दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने युवकासमवेत त्याच्या गावाला पलायन केले. तेथे पोहोचल्यावर युवक हिंदु नाही, तर मुसलमान असल्याचे तिला समजले. युवतीच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तसेच युवतीला तिच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहे.


धर्मांधाने ‘फेसबूक’च्या माध्यमातून मैत्री करून युवतीवर अनेक दिवस बलात्कार केला !

  • कानपूर (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’ !

  • आरोपीने पीडितेचे ५ लाख रुपये हडपल्याचा आरोप

हिंदु मुलींनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमानी झाल्यास आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन आत्मबल संपन्न झाल्यावरच त्यांचे धर्मांधांपासून रक्षण होणे शक्य आहे ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे धर्मांधाने हिंदु युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर तिची अश्लील छायाचित्रे काढली आणि त्या माध्यमातून अनेक दिवस लैंगिक शोषण केले. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला आणि पलायन केले. पीडितेने त्याचा शोध घेतला असता, त्याने अन्य युवतीशी निकाह (लग्न) केल्याचे तिला समजले.

१. कुलीबाजार भागात पीडिता तिची आई आणि बहिण यांच्या समवेत रहाते. पीडितेने एका युवकाशी फेसबूकवर मैत्री केली होती. कालांतराने तो मुसलमान असल्याचे तिला समजले. त्यानंतर ती त्याच्यापासून लांब राहू लागली. याच काळात तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तो पीडितेच्या घरी येऊन तिला सहानुभूती दाखवू लागला. आरोपीचे नाव सैफ असल्याचे म्हटले जाते.

२. सैफने पीडितेच्या आईला तिच्याशी लग्न करण्यासाठी राजी केले. सैफवर आरोप आहेत की, त्याने हॉटेलमध्ये नेऊन पीडितेवर बलात्कार केला आणि तिची अश्लील छायाचित्रे काढली. त्यानंतर त्याने पीडितेचे सातत्याने लैंगिक शोषण केले. काही दिवसांनी पीडिता गर्भवती राहिली. तेव्हा त्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. एक दिवस तो ४० दिवसांसाठी ‘जमात’ वर जात असल्याचे सांगून निघून गेला. ५० दिवसांनीही त्याच्याविषयी काही समजले नाही. तेव्हा पीडितेने त्याचा शोध घेतला असता त्याने दुसर्‍या मुलीशी निकाह (लग्न) केल्याचे समजले.

३. याच काळात त्याने पीडितेपासून ५ लाख रुपये घेतले. जे त्याने परत केले नाहीत. माध्यमांच्या माहितीप्रमाणे पीडितेला लग्न न करण्याची धमकी देणार्‍या आरोपीने स्वत: लग्न केले. सैफ पीडितेला तिची अश्लील छायाचित्रे माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत आहे. आरोपी नोंदणीकृत गुन्हेगार असल्याचे म्हटले जाते. यापूर्वी त्याच्या विरोधात ‘गुंडा ॲक्ट’ अंतर्गत कारवाईही झाली आहे.