विनाकारण जे ‘टी.ई.टी.’ परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांची परीक्षा पुन्हा घ्या ! – युवासेना

माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर (डावीकडे) यांना निवेदन देतांना युवासेनेचे मंजित माने (गळ्यात शिवसेनेचा मफलर असलेले) आणि युवासैनिक

कोल्हापूर – महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने २१ नोव्हेंबर या दिवशी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (‘टी.ई.टी.’) अनेक विद्यार्थ्यांना केवळ २ मिनिटे विलंब झाला म्हणून प्रवेश नाकारण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांच्या ‘हॉल तिकीट’ (परीक्षा अनुमती पत्र)वर चुकीचा पत्ता टाकण्यात आला होता. त्यामुळे तो शोधण्यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला त्याचे दायित्व कुणाचे ? त्यामुळे जे विद्यार्थी विनाकारण  ‘टी.ई.टी.’ परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांची परीक्षा पुन्हा घ्या, अशा मागणीचे निवेदन युवासेनेचे जिल्हाधिकारी मंजित माने यांच्या नेतृत्वाखाली २२ नोव्हेंबर या दिवशी माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांना देण्यात आले.

या वेळी उपशहरप्रमुख वैभव जाधव, कुणाल शिंदे, विभागप्रमुख मंगेश चितारे, अभिजित कराडे, उदय चौगुले उपस्थित होते.