पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे, हे केंद्र सरकारचे पुढचे काम आहे ! – केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

नवी देहली – पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणे, हे केंद्र सरकारचा पुढचे काम आहे, असे विधान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एका कार्यक्रमात केले. ‘ज्या नेतृत्वाकडे घटनेच्या कलम ३७० मधील बहुतांश तरतुदी रहित करण्याची क्षमता आणि इच्छा आहे, त्यांच्यातच पाकिस्तानच्या नियंत्रणातून पाकव्याप्त काश्मीर परत आणण्याचीही क्षमता आहे’, असे सिंह म्हणाले.