असाध्य दुखण्यातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून शेवटपर्यंत साधना करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. चारू खैतान !

१०.६.२०२० या दिवशी झारखंड येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. चारू खैतान यांचे निधन झाले. त्यांची नणंद सौ. प्रीती पोद्दार यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

(कै.) सौ. चारू खैतान
सौ. प्रीती पोद्दार

१. चिकाटी

अ. ‘त्यांना शारीरिक त्रास होत असला किंवा झोपायला उशीर होत असला, तरीही त्यांना जे नामजपादी उपाय करायला सांगितले आहेत, ते त्या चिकाटीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करायच्या. त्या नेहमी साधना आणि नामजपादी उपाय यांनाच प्राधान्य द्यायच्या.

आ. ‘एक दिवस जरी नामजपादी उपाय करण्यात सवलत घेतली’, तरी लगेच दुसर्‍या दिवशी मन साधनेत लागत नाही’, हे त्यांच्या लक्षात आल्यावर नामजपादी उपाय करायला मन ‘नको’ म्हणत असले, तरीही त्या प्रतिदिन नामजपादी उपाय पूर्ण करायच्या.

२. मनमोकळेपणा

त्यांचे वागणे ‘आत एक, बाहेर एक’, असे नसायचे. जे मनात असेल, ते सर्व त्या प्रांजळपणे एखाद्या बालकाप्रमाणे सांगायच्या.

३. अनुसंधान

त्या प्रत्येक परिस्थितीत प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) हाक मारायच्या आणि त्यांना स्वतःच्या समवेत अनुभवायच्या. त्यांना पडताळायला येणारे आधुनिक वैद्य, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी या सर्वांमध्ये त्या प.पू. गुरुदेवांचे रूप अनुभवायच्या.

४. कृतज्ञताभाव

‘अनेक प्रकारे शारीरिक त्रास होत असतांना देवाने आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध करून दिली आणि प्रत्येक कठीण प्रसंगात त्याने सांभाळले’, याविषयी त्या सतत कृतज्ञतेच्या भावाने बोलायच्या.’

– सौ. प्रीती पोद्दार (नणंद), झारखंड (११.६.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक