मुंबई, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये १८ नोव्हेंबर या दिवशी शिवप्रेमींनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेतले. ज्या शिवप्रेमींना अंत्यदर्शनासाठी उपस्थित रहाता आले नाही, त्यांना त्यांच्या अस्थींचे दर्शन घेता यावे, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने हा अस्थीकलश मुंबईमध्ये आणण्यात आला होता. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबईचे प्रमुख श्री. बळवंत दळवी उपस्थित होते.
धारकरी श्री. प्रतीक पाडावे यांनी अस्थीकलश आणण्यामागील कारण विषद केले. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा सौ. मंजिरी मराठे, कार्यवाह श्री. राजेंद्र वराडकर, धारावी येथील वज्रदल संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय चिंदरकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर, सर्वश्री विमल जैन, प्रभाकर शिंदे यांसह अन्य शिवप्रेमी यांनी अस्थीकलशाचे दर्शन घेतले.