हिंदूंनो, विदेशी असूनही स्वामी विवेकानंदांच्या आज्ञेनुसार भारतीय भाषेचा वापर करण्यास सांगणार्‍या ‘भगिनी निवेदिता’ यांच्याकडून शिका !

‘मार्गारेट एलिझाबेथ नोबल ही स्वामी विवेकानंदाची शिष्या बनली आणि ‘भगिनी निवेदिता’ या नावाने प्रसिद्ध झाली.

‘मार्गारेट एलिझाबेथ नोबल ही आयर्लंडची एक स्त्री होती. ती नंतर स्वामी विवेकानंदाची शिष्या बनली आणि ‘भगिनी निवेदिता’ या नावाने प्रसिद्ध झाली.

मिदनापूरमध्ये स्वामीजींचे भाषण चालू होते. सर्व जण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. काही तरुणांनी हर्षाने ‘हिप हिप हुर्रे…’चा जयघोष केला. यावर स्वामीजी भाषण मध्येच थांबवून त्यांना रागावत म्हणाले, ‘‘गप्प बसा. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्हाला आपल्या भाषेचा जराही अभिमान नाही ? तुमचे वडील इंग्रज होते का ? तुमची आई गोर्‍या चामड्याची युरोपियन होती का ? तुम्हाला इंग्रजांची नक्कल शोभते का ?’’ हे ऐकून तरुण गप्प बसले. सर्वांच्या माना खाली गेल्या. मग भगिनी निवेदिता म्हणाल्या, ‘‘भाषणातील एखादी गोष्ट चांगली वाटली, तर स्वभाषेत बोलत जा. ‘सच्चिदानंद परमात्मा की जय, भारतमाता की जय, सद्गुरु की जय’, असा जयघोष करत जा.’’ तरुणांनी लगेच त्या निर्देशाचे पालन केले. भारतात प्राचीन काळातही प्रसन्नतेच्या अशा प्रसंगी ‘साधो साधो’ बोलण्याची प्रथा होती. ती पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने लोप पावली.’

(संदर्भ : मासिक ‘ऋषीप्रसाद’, नोव्हेंबर १९९९)