५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला म्हापसा, गोवा येथील कु. वेद दिनेश हळर्णकर (वय ११ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !  कु. वेद दिनेश हळर्णकर हा या पिढीतील एक आहे !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. वेद हळर्णकर

१. गर्भारपण

‘वेदच्या वेळी गर्भारपणात मला पुष्कळ त्रास झाला; पण अशाही स्थितीत मी साडेआठ मास पूर्ण होईपर्यंत दुचाकी वाहनावरून निरनिराळ्या सेवा करत होते.

२. प्रसुती

प्रसुतीच्या वेळी पुष्कळ वेदना होत असतांनाही मला नामजपावर लक्ष केंद्रित करता येत होते.

३. जन्मानंतर

सौ. नयना हळर्णकर३ अ. जन्म ते १ वर्ष

१. वेदला अंघोळ घालतांना किंवा भरवतांना मला आपोआपच नामजपाची आठवण यायची.

२. त्याला दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात घ्यायला आवडायचे.

३. वेद ११ मासांचा असतांना त्याला बोलता येत नसूनही तो ‘गँ’ आणि ‘दत्त’ असे उच्चारून जणू गणपति आणि दत्त यांचा नामजप करायचा.

३ आ. वय – १ ते ५ वर्षे

३ आ १. साधनेची आवड : तो एक ते दीड वर्षाचा असल्यापासून झोपतांना नामपट्ट्यांचे मंडल घालण्यास मला साहाय्य करत आहे. त्याला अंघोळीच्या वेळी श्लोक आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्याची आठवण असायची. त्याच्या सहवासात मला नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण यायची अन् आताही येते.

श्री. दिनेश हळर्णकर

३ इ. वय – ६ ते ११ वर्षे

३ इ १. बोधकथा वाचनाची आवड : वेदला वाचनाची आवड आहे. त्याला बोधपर कथा वाचायला आवडतात. सकाळी उठल्यावर तो प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतो. त्याला काही कळले नाही, तर त्याविषयी मला विचारतो.

३ इ २. चुकांविषयी गांभीर्य : वेदला त्याच्या चुका लिहायला सांगितल्या की, तो चुका लिहितो आणि आम्हालाही विचारतो. चुका झाल्यावर तो लगेच क्षमायाचना करतो.

३ इ ३. आज्ञापालन करणे : दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘आपत्काळाची सिद्धता’ याविषयीचे लेख वाचून त्याने स्वत:ची ‘बॅग’ सिद्ध करून ठेवली आहे. त्याने बॅगेत स्वत:चे कपडे, साबण, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू भरून ठेवल्या आहेत.

३ इ ४. वेद ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे चित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ नेहमी पहात असतो.

३ इ ५. कर्तेपणा देवाच्या चरणी अर्पण करणे : वेदने एखादी कृती चांगली केली, तर तो लगेच ‘देवानेच करून घेतली’, असे म्हणतो. आम्ही घरी कधी बोलतांना ‘मी’, ‘माझे’ असे शब्द वापरले, तर तो सांगतो, ‘‘देवाने करून घेतले’’, असे म्हणायला पाहिजे.’’

४. स्वभावदोष

उलट बोलणे आणि हट्टीपणा करणे.’

– सौ. नयना दिनेश हळर्णकर (कु. वेदची आई), म्हापसा, गोवा. (२३.२.२०२१)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.