शहापूर येथे प.पू. रमणनाथजी महाराज बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन !

प्रतीकात्मक छायाचित्र

ठाणे, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – प.पू. रमणनाथजी महाराज बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने शहापूर येथील भोगावती नगर भागातील तानसा परिसरात १७ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत त्रिपुरारी पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष आणि मठाधिपती प.पू. स. अलोकनाथजी महाराज यांनी हे आयोजन केले आहे. या प्रसंगी हरिपाठ, भजन, कीर्तन, होम-हवन, अभिषेक, तुलसी विवाह, दीपोत्सव असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्रिदिनात्मक ‘अनघादत्त’ पंचकुंडी महायागाचेही आयोजन केले आहे. तरी सर्व भक्तगणांनी या भक्तीमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.