सावंतवाडी – सावंतवाडी-बेळगाव मार्गावरील आंबोली घाटात प्रतिवर्षी दरडी कोसळतात. विशेषत: पावसाळ्यात हा धोका अधिक असतो. त्यामुळे काही वेळा या मार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागते. यावर उपाय म्हणून आता आंबोली घाटात ‘वायर मेश’ (लोखंडी जाळ्या) लावण्यात येत आहेत. यामुळे घाटात दरड कोसळली, तरी दगड जाळीत अडकून रस्त्यावर न आल्याने वाहतुकीवर परिणाम होणार नाही.
या कामासाठीची निविदा संमत झाली असून ठेकेदार आस्थापनाने कामाला प्रारंभ केला आहे. पुढील १० वर्षे याची देखभाल-दुरुस्ती या आस्थापनाकडे असणार आहे. वर्ष २०२२ च्या पावसाळ्यापूर्वी येथे जाळी आणि लोखंडी खांब (बार) बसवले जाणार आहेत.