सनातन संस्थेशी जोडलेल्या हिंदु धर्माभिमान्यांच्या माध्यमातून देवच समाजातील लोकांचे संस्थेविषयीचे अपसमज दूर करत असल्याचे लक्षात येणे

श्री. नंदकुमार कैमल

१. बलाढ्य संघटनेतील कार्यकर्त्यांनी सनातन संस्थेविषयी ऐकलेल्या नकारात्मक गोष्टी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना सांगितल्यावर त्या अधिवक्त्यांनी सनातनविषयीच्या स्वतःच्या अनुभवांद्वारे त्या कार्यकर्त्यांच्या मनातील अपसमज दूर करणे

‘एका हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी साहाय्यासाठी केरळ येथील बलाढ्य हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना संपर्क केला. तेव्हा सनातन संस्थेचा उल्लेख झाला. त्या वेळी बलाढ्य हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी संस्थेची कट्टर भूमिका आणि त्यांनी सनातन संस्थेविषयी ऐकलेल्या नकारात्मक गोष्टी सांगितल्या. त्या वेळी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते त्यांना म्हणाले, ‘‘सनातन संस्था ही एक चांगली आध्यात्मिक संघटना आहे आणि ती जगभर अध्यात्माचा प्रसार करत आहे. तुमच्या मनातील अपसमज दूर करायला तुम्ही एर्नाकुलम् जिल्ह्यात गेल्यावर श्री. नंदकुमार कैमल (मला) यांना प्रत्यक्ष भेटा आणि त्यांच्याशी बोलून अपसमज दूर करून घ्या.’’ तेव्हा त्यांनी बलाढ्य हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांना माझा संपर्क क्रमांकही दिला. त्या समवेत त्या अधिवक्त्यांनी गेल्या दोन वर्षांत संस्थेविषयी त्यांचे जे चांगले मत त्यांच्या स्वतःच्या मनात निर्माण झाले आहे, ते सर्व बलाढ्य हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

२. बलाढ्य संघटनेतील कार्यकर्त्यांचा सनातन संस्थेविषयीचा अपसमज अन्य एका अधिवक्त्याने दूर करणे, हे कालमाहात्म्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा असल्याची जाणीव होणे

वरील प्रसंग त्या अधिवक्त्यांनी मला भ्रमणभाष करून सांगितला. त्यांनी मला विनंती केली, ‘तुम्ही बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे अपसमज दूर केले पाहिजेत.’ हे ऐकल्यावर माझ्या लक्षात आले, ‘आता धर्मप्रेमी आणि आपल्याशी जोडलेले धर्मप्रेमी प्रसार करत आहेत. मोठ्या बलाढ्य संघटनेतील ज्येष्ठ व्यक्तीचा सनातन संस्थेविषयीचा अपसमज समाजातील अन्य एका अधिवक्त्याने दूर करून देणे, हे केवळ कालमहात्म्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आहे.’

– श्री. नंदकुमार कैमल, केरळ (२७.७.२०२१)