स्वयंपाकातील सर्व क्रिया आणि त्या करण्याची सगळी साधने यांचे झालेले इंग्रजीकरण म्हणजे स्वयंपाकघर बाटणे !

ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक

‘आमच्या घरात इंग्रजी शब्दांची वाळवी लागली आहे. ‘स्वयंपाकघर’ म्हटले, तर कुणाला कळत नाही. ‘किचन’ मात्र कळते. पूर्वी आमच्या स्वयंपाकघरात प्रत्येक उपकरणाला मराठी नाव असे; पण आज उपकरणे इंग्रजी नावांनी ओळखली जातात. मोदकपात्र, रवी, विळी, सुरी, खोवणे, उलथणे, पळी, डाव, चमचा, उकडणे, भाजणे, परतणे, वाफाळणे, शिजवणे, सोलणे, चिरणे, कापणे, कुटणे, मिसळणे या क्रिया आणि त्या करण्याची साधने मराठीत असूनही त्यास आज फ्राय, मिक्स हे इंग्रजी शब्द वापरले जातात. त्याची ना कुणाला खंत ना लाज ! स्वयंपाकघर बाटले की, सर्व संपले !’

– ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक, पुणे. (३५)