हृदयाचा रामनाथीला जाण्याचा हट्ट ।

एकदा काय झाले ? आमचे हृदय रडू लागले ।
रामनाथीला जाण्याचा हट्ट करू लागले ।।
सांगून दमलो, तरी ऐकेना ।
पहावेना त्याची दैना ।। १ ।।

‘कुरिअर’ने पाठवून दिले साधकाकडे ।
सांगितले साधकांना त्याचे रडे ।।
ठेवून दिले परात्पर गुरु डॉक्टरांच्या कपाटात ।
बसू दे त्यांची वाट पहात ।। २ ।।

कपाटाच्या आत कोपर्‍यात बसून ।
घेत होते दर्शन मनापासून ।।
त्याची होती इच्छा एकच ।
अलगद देवाच्या ओंजळीत बसावे ।।
बोलाव्यात गोष्टी पोटभर ।
पण वेळ नसतो त्यांना घटकाभर ।। ३ ।।

वाट पाहून पाहून त्याचे डोळे पाझरू लागले ।
कपाटातील सामान भिजू लागले ।।
त्याने हळूच रुमाल घेतला (न विचारता ?) ।
आणि आपला डोळा पुसला । (जरूर शिक्षा करा !) ।। ४ ।।

दिवस चालले, मास गेले ।
हृदयाला अश्रू ना आवरले ।।
त्याला वाटले आता जाणार आपला जीव ।
त्याचीच त्याला आली कीव ।।
दोन पावले चालायचे नाही राहिले त्राण ।
सहन होईना त्याला मनाचा ताण ।। ५ ।।

प्राण आले कंठाशी जेव्हा ।
दीपावली प्रकाशली त्याच्या जीवनात तेव्हा ।।
रुद्ध कंठाने ते देवाला म्हणाले, आभार, आभार ।
ओंजळीत उचललास ना आमचा भार ।। ६ ।।

आता आनंदाने गाईल आमुची वाणी ।
जयतु जयतु हिन्दु राष्ट्राची गाणी ।।
तुझी ‘प्रतिज्ञा’ सुराज्याची ।
पुरी करू आनंदाने साची ।।
वाटेत येवोत अडथळे अपार ।
करू ते भरभर पार ।। ७ ।।

ऐकून हृदयाचे हे बोल ।
झालास ना देवा तू अबोल ।।
हळूच डोकावून पाहू लागले ते तुझे पद ।
तुझ्या स्पर्शाने वाढवलीस ना देवा त्याची ताकद ।। ८ ।।

तुझ्या पदस्पर्शाने नाचू लागले आनंदाने ।
दूरभाष केला त्याने आम्हा स्वानंदाने ।।
म्हणाले ते सांभाळून ठेवीन देवाचा पाश ।
सुराज्य आणण्या करीन आसुरी प्रवृत्तींचे निर्मूलन ।। ९ ।।

आम्ही म्हणालो, रहा तेथेच खुशाल ।
पांघरून देवाच्या कृपेची शाल ।।
देवसान्निध्याचे फळ मिळाले ना मिठ्ठास ।
असो तुला तरी सदैव मिळो परात्पर गुरु डॉक्टरांचा सहवास ।।
तन-मनाने करत रहा सेवा ।
मिळो तुला आनंदाचा ठेवा ।। १० ।।

– पुष्पांजली, बेळगाव (२२.१०.२०१४, रात्री ११.२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक