‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चा सप्टेंबर २०२१ मधील प्रसारकार्याचा संख्यात्मक आढावा

१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा

१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या (सप्टेंबर २०२१ या मासातील)

१ आ. विविध माध्यमांतील सदस्यांची संख्या (सप्टेंबर २०२१ पर्यंतची)

१ इ. ‘ऑनलाईन’ प्रसार : या मासात ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’ आणि ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून १४ सहस्र १२६ जिज्ञासूंनी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.

२. ‘लॉग-इन’ सुविधा

सद्गुरु सिरियाक वाले

२ अ. ‘एस्.एस्.आर्.एफ्. अब्रॉड लॉग-इन’ सुविधा : या सुविधेच्या अंतर्गत सप्टेंबर २०२१ मध्ये इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश आणि रशियन या ४ भाषांतील वाचकांच्या ५९ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली.

२ आ. ‘एस्.एस्.आर्.एफ्. भारत लॉग-इन’ सुविधा : या अंतर्गत सप्टेंबर २०२१ मध्ये एकूण ४१ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली.

३. ‘लाईव्ह चॅट’ (संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान)

याद्वारे हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, सर्बाे-क्रोएशियन, फ्रेंच, इंडोनेशियन आणि रशियन या ७ भाषांतील ९८५ वाचकांशी संवाद साधता आला.

४. विविध देशांत घेण्यात आलेली ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून झालेला व्यापक प्रसार अन् जिज्ञासूंचा मिळालेला प्रतिसाद !

अ. सप्टेंबर २०२१ मध्ये अमेरिका आणि कॅनडा येथे इंग्रजी भाषेत; क्रोएशिया, सर्बिया, रशिया आणि मॅसेडोनिया येथे सर्बियन अन् क्रोएशियन या भाषांत; इंडोनेशिया येथे इंडोनेशियन भाषेत; युनायटेड किंगडम, फ्रान्स, रोमानिया, हंगेरी, हॉलंड, बेल्जियम, इस्रायल, इस्टोनिया आणि इटली येथे इंग्रजी अन् फ्रेंच या भाषांत; तर बोलिव्हिया, व्हेनेझुएला आणि मेक्सिको येथे स्पॅनिश भाषेत, अशी एकूण ९ ‘ऑनलाईन’ व्याख्याने अन् २ कार्यशाळा घेण्यात आल्या. ९५६ जिज्ञासूंनी या प्रवचनांचा, तर ९ जिज्ञासूंनी कार्यशाळांचा लाभ घेतला.

आ. सप्टेंबर २०२१ मध्ये सद्गुरु सिरियाक वाले यांनी २८ ‘ऑनलाईन’ नामजप सत्रे’ घेतली. त्यांचा एकूण ६ सहस्र ७३५ साधक आणि जिज्ञासू यांनी लाभ घेतला.

५. एका ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात एस्.एस्.आर्.एफ्.ला मिळालेला प्रतिसाद

५ अ. एका ‘ऑनलाईन’ परिषदेत एस्.एस्.आर्.एफ्.ने सहभाग घेणे : १९ ते २९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत एका देशात आयोजित करण्यात आलेल्या एका ‘ऑनलाईन’ परिषदेत एस्.एस्.आर्.एफ्.ने सहभाग घेतला होता. ८.९.२०२१ या दिवशी या परिषदेच्या उद्घाटनाचा एक कार्यक्रम (ओपनिंग सेशन) आयोजित करण्यात आला आणि त्याचे ‘फेसबूक’वर थेट प्रसारण करण्यात आले. परिषदेत सहभाग घेतलेल्या वक्त्यांचा परिचय, तसेच ‘द लव्ह इन द ॲडिक्शन (व्यसनाच्या माध्यमातून व्यक्ती प्रेम आणि आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असते; मात्र व्यसन अस्वास्थ्यकारी असून व्यसनापासून मुक्त होण्याचे मार्ग कोणते आहेत अन् जीवन सकारात्मक पद्धतीने कसे जगावे ?)’, या विषयावर खुले चर्चासत्र’, असे या परिषदेच्या उद्घाटनाचे स्वरूप होते. परिषदेच्या उद्घाटनाचे हे थेट प्रक्षेपण १३० जिज्ञासूंनी पाहिले.

५ आ. परिषदेत सहभागी झालेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या एका साधिकेच्या ‘ऑनलाईन’ मुलाखतीला मिळालेला प्रतिसाद

१. परिषदेच्या आयोजकांनी ३०.८.२०२१ या दिवशी परिषदेत सहभाग घेतलेल्यांच्या ‘ऑनलाईन’ मुलाखती घेतल्या. त्या अंतर्गत एस्.एस्.आर्.एफ्.च्या एका साधिकेची ‘ऑनलाईन’ मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत २८.९.२०२१ या दिवशी आयोजकांच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आली होती. ३५० लोकांनी ही मुलाखत पाहिली, तसेच ५० लोकांनी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट दिली.

२. ज्या दिवशी मुलाखत प्रसारित करण्यात आली, त्या दिवशी आणि त्यानंतरचे काही दिवस अनेक जिज्ञासूंनी ‘लाईव्ह चॅट’ (संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान) या माध्यमातून प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले, काहींनी एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली, तर काहींनी संकेतस्थळावर स्वतःची नावनोंदणी (रजिस्ट्रेशन) केली.

६. विविध विभागांत घेण्यात आलेल्या सत्संगांची संख्या

 

७. जगभरातील एकूण १९५ देशांपैकी (टीप १) १९१ देशांत एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ पहाणारे जिज्ञासू आहेत.

टीप १ – सध्या जगभरात एकूण १९५ देश आहेत. त्यांतील १९३ देश ‘संयुक्त राष्ट्रां’चे सदस्य आहेत. २ देश (‘होली सी’ आणि ‘स्टेट ऑफ पॅलेस्टाईन’) संयुक्त राष्ट्रांत केवळ पर्यवेक्षक आहेत, म्हणजे ‘संयुक्त राष्ट्रां’च्या बैठकांना पर्यवेक्षक म्हणून बसू शकतात. या व्यतिरिक्त ‘संयुक्त राष्ट्रां’च्या ११ व्या सनदी अध्यायात १७ स्वयंशासित नसलेले प्रदेश आहेत, ज्यांतील लोकांना अजून स्वतःचे शासन प्रमाणित केले नाही. ‘संयुक्त राष्ट्रां’च्या काही सदस्य देशांकडे अशा प्रदेशांचे प्रशासकीय अधिकार आहेत.

श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’

– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (ऑक्टोबर २०२१)

‘लाईव्ह चॅट’च्या माध्यमातून एका जिज्ञासू महिलेने दिलेला अभिप्राय एस्.एस्.आर्.एफ्. करत असलेले कार्य विस्मयकारक आहे !

‘तुमच्या (‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या) संकेतस्थळावर ठेवलेला नामजप घरात लावण्याचा मी प्रयत्न करीन. तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद ! ‘ऑनलाईन’ कार्यक्रमामुळे मला एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाविषयी कळले. तुमच्या एका साधिकेची मुलाखत मी पाहिली. त्यांनी मुलाखतीत सांगितलेली माहिती ऐकून माझ्यात उत्सुकता निर्माण झाली असून मला ‘नामजप करावा’, असे वाटत आहे. या विषयाशी मी पूर्णतः अनभिज्ञ आहे; परंतु मी नक्की प्रयत्न करीन. एस्.एस्.आर्.एफ्. करत असलेले कार्य विस्मयकारक आहे.’ – एक जिज्ञासू