‘एरव्ही गुरु शिष्यांना आनंद देतात. आज सौ. योया वाले यांनी संतपदावर आरूढ होऊन मला शब्दातीत आनंद दिला !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.१०.२०२१) |
पू. (सौ.) योया वाले यांची मुलगी कु. अनास्तासिया वाले हिने व्यष्टी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित !
रामनाथी – स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) फ्रान्स येथील; परंतु गेली काही वर्षे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेल्या साधिका सौ. योया सिरियाक वाले (वय ४१ वर्षे) समष्टी संतपदी विराजमान झाल्याचे ३० ऑक्टोबरला विदेशी साधकांच्या सत्संगात घोषित करण्यात आले. या वेळी पू. वाले यांची मुलगी कु. अनास्तासिया वाले (वय १७ वर्षे) हिने व्यष्टी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. पू. (सौ.) योया वाले यांचा सन्मान त्यांचे संत असलेले बंधू पू. देयान ग्लेश्चिच यांनी केला. कु. अनास्तासिया वाले हिचा सत्कार तिचे मामा, म्हणजेच पू. देयान ग्लेश्चिच यांनी केला. संत असणार्या भावाने संत बहिणीचा सन्मान, तर संत असणार्या मामाने ६१ टक्के पातळी गाठलेल्या भाचीचा सत्कार करण्याची ही दुर्मिळ घटना होय !
(सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)
एकाच कुटुंबात ३ संत असण्याचे दुर्मिळ उदाहरण !पू. (सौ.) योया वाले यांचे पती सद्गुरु सिरियाक वाले हे सद्गुरुपदावर आरूढ असून ते विदेशात अध्यात्मप्रसार करतात, तर पू. (सौ.) योया वाले यांचे भाऊ पू. देयान ग्लेश्चिच हे संत असून ते सध्या रामनाथी येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या आध्यात्मिक संशोधन केंद्रात वास्तव्य करून जगभर अध्यात्मप्रसाराची सेवा करत आहेत. मूळ विदेशी असणार्या एका अहिंदु कुटुंबात ३ संत असणे, हे दुर्मिळ उदाहरण आहे ! जलद आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवून केवळ जन्महिंदूंनाच नव्हे, तर अहिंदूंनाही संतपदी विराजमान करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिव्यत्वाची यातून प्रचीती येते ! |