लहान असूनही पुढाकार घेऊन इतरांकडून साधनेचे प्रयत्न करवून घेणारी ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अमरावती येथील कु. लावण्या सतीश बिलबिले (वय ७ वर्षे) !
अमरावती येथील बालसाधिका कु. लावण्या सतीश बिलबिले (वय ७ वर्षे) हिची तिच्या आईला (सौ. भावना बिलबिले यांना) जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. जन्मापूर्वी
‘गर्भारपणी मी श्रीमद्भगवद्गीता वाचतांना आणि देवपूजा करतांना पोटातील बाळ विशेष हालचाल करायचे.
२. जन्म
बालिकेचा जन्म श्रीकृष्ण जन्माष्टमीला झाला. बालिकेचे डोळे खरोखर कमल नयनाप्रमाणे वाटायचे.
३. विविध वयोगटांत जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
३ अ. जन्म ते २ वर्षे
३ अ १. देवाची आवड : बालिका (लावण्या) रांगत रांगत देवघराजवळ जाऊन डोके टेकून नमस्कार करत असे. एक वर्षाची असतांना लावण्या सर्व मोठ्या माणसांना नमस्कार करायची आणि ‘देवाला नमस्कार कर’, असे म्हटल्यावर साष्टांग नमस्कार करायची. तिला लहानपणी खेळायला खेळणी नको असायची, तर ती बाळकृष्णाची मूर्ती घेऊन खेळायची. ती देवघराजवळ जाऊन ‘देवाला स्नान घालणे, हळद-कुंकू लावणे’, या कृती करायची.
३ अ २. एकदा तिच्याकडून देवघरातील पादुकांमधील एक पादुका हरवली. नंतर ती सापडल्यावर तिच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.
३ आ. वय – २ ते ३ वर्षे
३ आ १. जिज्ञासू वृत्ती : लावण्याला पहिल्यापासूनच प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. तिला एखादी गोष्ट सांगितली, तर त्यासंदर्भात अनेक प्रश्न विचारून ती शंकानिरसन करून घेते. ‘आपण काय केले, तर देवाला आवडतो ?’, असा प्रश्न ती नेहमीच विचारते.
३ आ २. सात्त्विक गोष्टींची आवड : रामायण, विष्णुपुराण अशा सात्त्विक मालिका पहाणे, सात्त्विक कपडे घालणे आणि कुंकू लावणे’, या गोष्टी तिला आवडतात. तिला भगवद्गीता ऐकायलाही आवडते.
३ आ ३. छोट्या लावण्याने कवितेतून व्यक्त केलेली कृतज्ञता ! : एके दिवशी लावण्या सायंकाळच्या वेळी देवाजवळ बसून नमस्कार करत होती आणि पुढील ओळी म्हणत होती,
देवबाप्पा, देवबाप्पा आवडतोस मला, छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला ।
देवबाप्पा, देवबाप्पा, आवडतोस मला ।
छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला ।। १ ।।
आई दिली, बाबा दिले, छान छान मला ।
छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला ।। २ ।।
आजी दिली, आजोबा दिले, छान छान मला ।
छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला ।। ३ ।।
३ इ. वय – ४ ते ५ वर्षे
३ इ १. शेजारच्या आजींशी प्रेमाने वागणे : लावण्या सर्वांशी प्रेमाने बोलते. आमच्या शेजारी एक आजी रहातात. त्यांना कुणी नातेवाईक नाहीत. ती त्यांची प्रतिदिन प्रेमाने विचारपूस करते. त्या वेळी आजी भावूक होतात. ती आजींना प्रतिदिन श्रीकृष्णाची एक गोष्ट सांगते. कधी श्लोक पाठ करवून घेते, तर कधी त्यांना अभ्यास शिकवते. ती त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांविषयी सांगते आणि ‘आपण कसे वागलो ?’, म्हणजे गुरुदेवांना आवडते ?’, याविषयीही सांगते.
३ इ २. नेतृत्व गुण
३ इ २ अ. कुणाचे न ऐकणार्या शेजारच्या मुलाला घरी बोलावून त्याच्याकडून लावण्याने साधनेचे प्रयत्न करवून घेणे अन् त्याच्या समवेत ७ – ८ मुले प्रतिदिन साधना करण्यासाठी येऊ लागणे : आमच्या शेजारी एक मुलगा रहातो. जो लावण्यापेक्षा वयाने मोठा आहे. ‘तो कुणाचेच ऐकत नाही’, अशी त्याच्या पालकांची तक्रार असते. हे लावण्याला कळल्यावर एक दिवस तिने त्याला घरी बोलवले. त्याच्याकडून ‘नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, क्षमायाचना आणि आत्मनिवेदन’ हे सर्व करून घेतले. त्या मुलालाही त्यातून आनंद मिळाला. नंतर तो मुलगा प्रतिदिन सायंकाळी साधना करण्यासाठी घरी येऊ लागला. त्याचे अनुकरण करून आता आसपासची ७ – ८ मुले-मुली प्रतिदिन सायंकाळी आमच्याकडे येत आहेत. लावण्या पुढाकार घेऊन त्यांच्याकडून साधनेचे प्रयत्न करवून घेते.
३ इ २ आ. इतर मुले चित्रपटगीते म्हणत असतांना लावण्याने ‘यदा यदा हि धर्मस्य’, हा श्लोक म्हणणे : एकदा इतर मुलांसमवेत खेळत असतांना ती मुले चित्रपटातील गीते म्हणत होती. त्या वेळी लावण्याने मोठ्याने ‘यदा यदा हि धर्मस्य’, हा श्लोक म्हटला. शेजारी बसलेल्या काही महिलांचे तिच्याकडे लक्ष गेल्यावर त्यांनी ‘तू काय म्हणत होतीस ?’, असे विचारले. तेव्हा लावण्याने ‘‘भगवान श्रीकृष्ण प्रत्येक युगात धर्मसंस्थापनेसाठी येतो’’, असे सांगितले.
३ इ ३. आध्यात्मिक पातळीची नाही, तर गुरुचरणी जाण्याची ओढ असलेली लावण्या ! : लावण्याच्या चुलत बहिणीची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के घोषित झाल्यावर मी तिला म्हटले, ‘‘तूसुद्धा साधना कर, म्हणजे तुलाही देव असा प्रसाद (म्हणजेच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी) देईल.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला गुरुदेवांच्या चरणांजवळ जायचे आहे.’’ त्या वेळी तिचा भाव जागृत झाला होता.
३ इ ४. गुरूंप्रती भाव : लावण्या शाळेतील शिक्षकांमध्ये गुरुदेव असल्याचा भाव ठेवते. ‘ती अभ्यास चांगला करते’, असे तिच्या शिक्षिका सांगतात. त्या वेळी ‘प.पू. गुरुदेवच मला अभ्यास शिकवतात’, असे लावण्या सांगते.
३ इ ५. श्रीकृष्णाप्रती भाव : जेवणापूर्वी लावण्या श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवते. ती श्रीकृष्णाला जेवायला बोलावते आणि नंतर स्वतः जेवते. ती शाळेतील मैत्रिणींना सांगते, ‘‘श्रीकृष्ण आपल्या समवेत सदैव असतो. तो आपले रक्षण करतो. त्यामुळे आपण घाबरायचे नाही.’’ एकटी खेळत असतांना ती स्वतः कृष्ण असल्याचा भाव ठेवून खेळते.
३ इ ६. गोकुळाष्टमीच्या दिवशी कृष्णाचा वाढदिवस न करता केवळ स्वतःचा वाढदिवस केल्याने त्याची क्षमा मागणे : गोकुळाष्टमीला तिचा वाढदिवस केला. त्या वेळी ती म्हणाली, ‘‘आई, मी माझाच वाढदिवस केला. श्रीकृष्णाचा वाढदिवस केलाच नाही.’’ नंतर तिने जन्माष्टमीची पूर्ण सिद्धता केली आणि ‘कृष्णा, मी केवळ माझ्या एकटीचाच वाढदिवस केला, तुला विसरूनच गेले. मला क्षमा कर’, अशी श्रीकृष्णाची क्षमा मागितली.
३ इ ७. घरातील सत्संगाची भावपूर्ण सिद्धता करणे : दळणवळण बंदीच्या आधी आमच्याकडे प्रत्येक आठवड्याला सत्संग असायचा. त्या वेळी आसपासच्या सर्वांना बोलावणे, घरातील सर्व आवरून सत्संगाची सिद्धता करणे, या सर्व कृती लावण्या भावपूर्ण रितीने करायची.
३ इ ८. आढाव्यात भावप्रयोग घेण्यापूर्वी स्वतः तसा भाव ठेवून कृती करणे : लावण्या आता जिल्ह्यातील बालसाधकांच्या आढाव्यात नियमित आढावा देते. त्यात कधी कधी तिला भावप्रयोग घेण्याची सेवा असते. आढाव्यात जो भावप्रयोग घेणार, तसा भाव ती उठल्यापासून स्वतः ठेवते आणि त्यानुसार कृती करते, उदा. ‘गोपीभाव’ ठेवायचा असल्यास ती त्या दिवशी स्वतः राधा असल्यासारखे वागते.
३ इ ९. अनुभूती – सूक्ष्मातून गुरुदेवांचे दर्शन होण्यासाठी धावा करणे आणि खरोखरंच सूक्ष्मातून गुरुदेवांचे दर्शन होणे : वर्ष २०२० मधील गुरुपौर्णिमा ‘ऑनलाईन’ स्वरूपात होती. त्या दिवशी ती सकाळपासूनच भावस्थितीत होती. तिच्या प्रत्येक कृतीमधून भाव जाणवत होता. सकाळच्या कार्यक्रमाच्या वेळी तिला गुरुदेवांचे सूक्ष्मातून दर्शन न झाल्याने ती थोडी दुःखी झाली. त्यानंतर तिने त्यांचा अधिकच धावा केला आणि खरोखर तिला गुरुदेवांचे सूक्ष्मातून दर्शन झाले आणि त्यांनी सूक्ष्मातूनच तिच्या डोक्यावरून हात फिरवला.’
४. कु. लावण्यामधील स्वभावदोष
काही वेळा हट्टीपणा करणे.’
– सौ. भावना सतीश बिलबिले (कु. लावण्याची आई), अमरावती (१.९.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |