निधनापूर्वीच लिंगदेह आनंदाने पुढील प्रवासाला निघाल्याचे अनुभवणार्‍या आणि ‘निर्विचार’ नामजपातून शांती अनुभवणार्‍या कै. (सौ.) प्रमिला केसरकर !

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची सूक्ष्मातील कळण्याची वैशिष्ट्ये

परात्पर गुरु डॉ. आठवले

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची सूक्ष्मातील कळण्याची जी वैशिष्ट्ये त्यांच्या अनेक वर्षांच्या साधनेत कळली नव्हती, ती त्यांच्या देहत्यागापूर्वीच्या सुमारे ३ महिन्यांच्या कालावधीत त्यांना आलेल्या अनुभूतींवरून लक्षात येतात. तीव्र आजारपणातही साधनेत वेगाने प्रगती केल्याबद्दल त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१०.२०२१)

१. सौ. प्रमिलाला लिंगदेह पुढच्या प्रवासाला निघाल्याचे आणि स्थूलदेह अन् लिंगदेह यांना जोडणारी रूपेरी तार तुटल्यावर लिंगदेह आनंदाने पुढील प्रवासासाठी निघाल्याचे दिसणे

कै. (सौ.) प्रमिला केसरकर

‘२.७.२०२१ या दिवशी सायंकाळी सौ. प्रमिला मला म्हणाल्या, ‘‘मी नेहमीप्रमाणे नामजप करत अंथरुणावर पडले होते. मला झोप लागत नव्हती. त्या वेळी मला पुढील दृश्य दिसले – ‘मी स्थूलदेह सोडला असून माझा लिंगदेह पुढच्या प्रवासाला निघाला आहे; परंतु मी पुनःपुन्हा मागे वळून माझ्या स्थूलदेहाकडे पहात आहे. त्या वेळी माझ्याकडून स्थूलदेहाप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. त्याच वेळी मला माझा स्थूलदेह आणि लिंगदेह यांना जोडणारी रूपेरी तार तुटल्याचे आणि माझा लिंगदेह आनंदाने पुढील प्रवासासाठी निघाल्याचे मला दिसले.’

२. ‘निर्विचार’ नामजप श्वासाला जोडून चालू असतांना काही अडथळे येणे, ‘आत लक्ष देण्यास सांगून मनाची शांती अनुभवायची आहे’, असा विचार देवाने देणे आणि नंतर शांती अनुभवता येऊन ‘निर्विचार’ नामजपाचे महत्त्व लक्षात येणे

अधिवक्ता रामदास केसरकर

त्यानंतर त्या म्हणाल्या, ‘‘काही वेळाने माझा नेहमीप्रमाणे ‘निर्विचार’ नामजप श्वासाला जोडून चालू असतांना मला शांत वाटत होते; परंतु माझ्या नामजपात काही अडथळे येत असल्याचे जाणवले. नामजपात पंखा, शीतकपाट आणि रातकिडे यांच्या आवाजाचा अडथळा येत होता. त्यामुळे मी पंखा बंद केला; पण मग ‘रातकिडे आणि शीतकपाट यांचा आवाज कसा बंद होणार ?’, असा प्रश्न मला पडला. त्या वेळी देवाने आतून विचार सुचवला, ‘तू आत लक्ष दे. आपल्याला मनाची शांती अनुभवायची आहे.’ त्याप्रमाणे मी त्या बाह्य आवाजांकडे दुर्लक्ष करून माझ्या श्वासाच्या लयीकडे लक्ष केंद्रित करून ‘निर्विचार’ नामजप चालू केला. तेव्हा मला शांती अनुभवता आली आणि अखंड शांती प्राप्त करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘निर्विचार’ नामजपाचे महत्त्व लक्षात आले.’’

– अधिवक्ता रामदास केसरकर, सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१०.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.