महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे आध्यात्मिक संशोधन केंद्र असलेली वास्तू हालल्याप्रमाणे जाणवणे

श्रीमती मारिया व्हिदाकोव्ह

‘अनेक वेळा मला फोंडा, गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे आध्यात्मिक संशोधन केंद्राची वास्तू हालल्याप्रमाणे जाणवते. १४.९.२०२० या दिवशी मला ती हालत असल्याचे अधिक स्पष्टपणे जाणवले. आम्ही आमच्या कक्षात प्रार्थना करत असतांना मला वास्तू हलत असल्यासारखे वाटले. त्या वेळी ‘जणूकाही संपूर्ण वास्तू हालत आहे’, असे मला वाटले. तेव्हा मला ‘वास्तू पाण्यावर तरंगत आहे किंवा वार्‍यावर झुलत आहे’, असेही वाटले. श्रीकृष्णाने मला ही अनुभूती दिल्यामुळे त्याच्या चरणी कृतज्ञता !’

– श्रीमती मारिया व्हिदाकोव्ह (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), युरोप. (१४.९.२०२०)

(‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे आध्यात्मिक संशोधन केंद्राच्या वास्तूत वायुतत्त्वाचे प्रमाण वाढल्याने साधिकेला ही अनुभूती आली.’ – संकलक)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक