‘ॐ निर्विचार’ हा नामजप ध्वनीक्षेपकावर ऐकल्यावर ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘५.७.२०२१ ते ११.७.२०२१ या कालावधीत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या’ संगीत विभागाच्या समन्वयक आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील ‘ॐ निर्विचार’ हा नामजप ध्वनीक्षेपकावर ऐकला. हा नामजप ऐकल्यावर मला विविध दिवशी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

५.७.२०२१

अ. मला पुष्कळ थकवा येऊन मी झोपले होते, तसेच मला ‘नामजप ऐकू नये’, असे वाटत होते. जेव्हा मी नामजप ऐकला, तेव्हा मला होणारे त्रास न्यून झाले.

आ. जेव्हा मी नामजप ऐकू लागले, तेव्हा ‘ॐ’ मधून निर्गुण शक्तीचा प्रवाह माझ्याकडे येतांना जाणवला. तेव्हा माझे आज्ञाचक्र जागृत झाले आणि मला ‘निर्विचार’ या नामजपातील निर्गुण चैतन्य ग्रहण करता आले.

इ. १० मिनिटे नामजप ऐकल्यावर माझी प्राणशक्ती वाढल्याचे मला जाणवले आणि माझा उत्साहही वाढला.

६.७.२०२१

मी नामजपाला जाण्यापूर्वी पुष्कळ मरगळ जाणवत होती आणि डोक्यावर दाबही पुष्कळ प्रमाणात जाणवत होता. ‘माझ्याभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण पुष्कळ प्रमाणात आलेले आहे’, असे जाणवले. ‘मी नामजप ऐकतांना त्यांतील चैतन्य माझ्याभोवतीचे आवरण भेदून जाण्यास वेळ लागत आहे’, असे जाणवले. सलग १० मिनिटे नामजप ऐकल्यानंतर माझ्या भोवतीचे आवरण न्यून होऊन माझ्या डोक्यावरील जडपणा थोडा न्यून झाला आणि मला थोडे बरे वाटू लागले.

कु. तेजल पात्रीकर

७.७.२०२१

नामजपाला जाण्यापूर्वी मला पुष्कळ थकवा जाणवत होता आणि काहीही सुचत नव्हते. नामजप ऐकतांना नामजपातील चैतन्याच्या लहरी माझे आज्ञाचक्र, सहस्रारचक्र आणि दोन्ही कान यांच्याद्वारे माझ्या देहात जातांना जाणवल्या. ऐकल्यानंतर मला प्रसन्न वाटून हलकेपणा आणि उत्साह जाणवू लागला.

८.७.२०२१

प्रयोगापूर्वी माझ्या मनातील विचारांचे प्रमाण वाढले आणि नंतर न्यून झाले. माझे शरीर आणि मन यांच्यावरील आवरण न्यून झाल्याने मला प्रसन्नता वाटून माझा उत्साह वाढला.

९.७.२०२१

या दिवशी अमावास्या असल्यामुळे प्रयोगापूर्वी माझे डोके जड झाले होते आणि मला थोडे अस्वस्थ वाटत होते. नामजप ऐकल्यावर डोक्यावरील जडपणा न्यून होऊन माझ्या मनाची अस्वस्थता न्यून झाली आणि माझे मन प्रसन्न झाले.

१०.७.२०२१

प्रयोगापूर्वी मला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि माझे डोके अन् घसा यांच्यावर दाब जाणवत होता. प्रयोगानंतर माझा श्वास मोकळा झाला आणि माझे डोके अन् घसा यांवर जाणवणारा दाब न्यून झाला.

११.७.२०२१

प्रयोगापूर्वी माझ्या घशावर दाब जाणवून मला श्वास घेण्यास त्रास होत होता. प्रयोगाच्या वेळी नामजप ऐकत असतांना माझा नामजप काही क्षण झाल्यावर नामजपातील चैतन्य माझ्या अंतर्मनापर्यंत झिरपत असल्याचे जाणवले. त्यामुळे मला थोडे बरे वाटले.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.७.२०२१)

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करण्याचे महत्त्व !

‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते, तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक