इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांची मुलगी इस्लाम त्यागून हिंदु धर्म स्वीकारणार !

सुकमावती

जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांची ७० वर्षांची मुलगी सुकमावती यांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. २६ ऑक्टोबर या दिवशी सुकमावती या हिंदु धर्माचा विधीवत स्वीकार करणार आहेत. सुकमावती यांच्या ३ मुलांनीही त्यांना यासाठी अनुमती दिली आहे. सुकर्णो परिवार मूळचा हिंदु होता.