बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी ‘लज्जा’ कादंबरीवरील बंदी का उठवली नाही ? – कादंबरीच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांचा प्रश्‍न

पंतप्रधान शेख हसिना यांना असे प्रश्‍न विचारावे लागतात, यावरूनच ‘त्या हिंदूंच्या रक्षणार्थ विशेष काहीच करणार नाहीत’, असेच भारताने लक्षात घ्यायला हवे आणि बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणार्थ स्वतःहून कृती केली पाहिजे; मात्र आतापर्यंतचा अनुभव पहाता भारत असे काही करण्याची शक्यताच नाही ! – संपादक

डावीकडून पंतप्रधान शेख हसिना आणि लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – ‘लज्जा’ ही कादंबरी मी बांगलादेशातील धार्मिक हिंसाचाराच्या विरोधात लिहिली होती. २८ वर्षांपूर्वी बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान खालिदा झिया यांनी त्यावर बंदी घातली. जर आताच्या पंतप्रधान शेख हसिना धार्मिक हिंसेच्या विरोधात आहेत, तर त्यांनी पुस्तकावरील बंदी का उठवली नाही, असा प्रश्‍न या कादंबरीच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करून विचारला आहे. बांगलादेशात कुराणच्या कथित अवमानावरून धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणानंतर पंतप्रधान शेख हसिना यांनी ‘आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नसरीन यांनी हे ट्वीट केले आहे. ‘लज्जा’ या कादंबरीत धर्मांधांकडून हिंदूंवर करण्यात आलेल्या अत्याचारांचे कथन आहे. त्यामुळे धर्मांधांनी दबाव टाकून त्यावर बांगलादेशात बंदी घालण्यास भाग पाडले, तसेच तस्लिमा नसरीन यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नसरीन यांना बांगलादेशातून पलायन करावे लागले. त्या गेल्या २८ वर्षांपासून आजही विस्थापित म्हणून भारत आणि अन्य देश येथे वास्तव्य करत असतात.