बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचा अमेरिकेकडून निषेध !

ख्रिस्ती अमेरिकेने बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध केला, भारत कधी करणार ? आणि हिंदूंच्या रक्षणासाठी पुढाकार कधी घेणार ? कि गांधीगिरीचेच अनुकरण आताही करणार ? – संपादक

वॉशिंग्टन (अमेरिका) – धर्मस्वातंत्र्य हा मानवी अधिकार आहे. जगभरातील प्रत्येक व्यक्तीला तिचे सण साजरे करतांना सुरक्षित वाटले पाहिजे. आम्ही बांगलादेशातील हिंदु समुदायावरील आक्रमणांच्या घटनांचा निषेध करतो, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

बांगलादेशी हिंदु समुदायाचे सदस्य प्रणेश हलदर यांनी एका निवेदनात ‘बांगलादेशातील हिंदूंना आणखी कोणतीही हानी पोचणार नाही’, यासाठी अमेरिकेने आश्‍वस्त करावे’, असे आवाहन त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला केले. (हलदर असे आवान भारताला न करता अमेरिकेला करतात, हे भारतासाठी लज्जास्पद ! – संपादक) तसेच तेथील हिंदूंवरील आक्रमणांना प्रसारमाध्यमांना वाचा फोडावी, अशी मागणीही केली.