राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकासनिधीमध्ये १ कोटींची वाढ !

पुणे, १६ ऑक्टोबर – राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकासनिधीत १ कोटी रुपयांची वाढ करून तो ४ कोटी रुपये केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी प्रतिवर्ष ४ कोटींचा निधी उपलब्ध होईल. विधानसभेतील २८८ आणि विधान परिषदेतील ६२ आमदारांना निधीचा लाभ घेता येईल.