रतलाम (मध्यप्रदेश) – विश्व हिंदु परिषदेने येथील श्री दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये, तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्य धर्मियांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. याविषयीची भित्तीपत्रके संपूर्ण शहरात लावण्यात आली आहेत.
गरबा पंडालों में गैर हिंदुओं के प्रवेश पर रोक! विश्व हिंदू परिषद के नेता ने लगाए बैनरhttps://t.co/3JfUYxrrO9
— Zee MP-Chhattisgarh (@ZeeMPCG) October 11, 2021
१. विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, अहिंदू लोक हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा आणि पूजा करण्याची पद्धत यांचे पालन करत नाहीत; म्हणून त्यांनी मंडपांमध्ये येऊ नये. गेल्या काही वर्षांपासून मंडपांमध्ये अहिंदू तरुणांकडून समाजविघातक कृत्ये केली जात आहेत. यामुळेच भित्तीपत्रके लावून अहिंदूंना मंडपांत न येण्याची सूचना दिली गेली आहे.
२. यावर रतलाम प्रशासनाने ‘याविषयी आतापर्यंत कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही. आमच्याकडे तक्रार असल्यास आम्ही कारवाई करू’, असे म्हटले आहे. (भाजपच्या राज्यात असे होणे अपेक्षित नाही ! – संपादक)