अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांसारखे देश अल्पसंख्यांकांसाठी सुरक्षित नाहीत ! – तस्लिमा नसरिन, बांगलादेशी लेखिका

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरिन

नवी देहली – अफगाणिस्तानात सुन्नी मुसलमानांनी शिया मुसलमानांना मशिदीमध्ये नमाजपठण करतांना ठार मारले. तालिबानने हजारा (मुसलमानांमधील एक समाज) समाजातील लोकांनाही ठार मारले. सुन्नी पाकिस्तानात शिया, अहमदिया आणि ख्रिस्ती यांना ठार मारतात. जे देश अल्पसंख्यांक समुदायासाठी सुरक्षित नाहीत, ते निश्‍चित सुसंस्कृत नाहीत, अशी टीका प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरिन यांनी एका ट्वीटद्वारे केली आहे.