गुन्हेगारांची वाढती मुजोरी रोखण्यासाठी त्यांना कायद्याची आणि पोलिसांची जरब वाटेल अशी कठोर शिक्षा करायला हवी, तरच ते असे कृत्य करण्यास धजावणार नाहीत.
पिंपरी (पुणे), ७ ऑक्टोबर – जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केलेल्या अतुल उपाख्य चांड्या अविनाश पवार या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीने कोयता दाखवून ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’ अशी धमकी दिली. या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पवारला २ वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तो कालावधी संपण्यापूर्वीच शहरात आला होता.
तसेच हर्षल उपाख्य गबर्या पवार हा २ वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार होता. त्याचा कालावधी संपण्यापूर्वीच शहराच्या हद्दीत आल्याने त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या गणवेशाची कॉलर पकडून हर्षलने धक्काबुक्की केली. तसेच रेड्डी या पोलीस शिपायास जिवे मारण्याची धमकी दिली.