श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीची स्वच्छता करतांना साधकाला आलेली अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीची स्वच्छता करतांना ‘त्या प्रत्यक्ष सुखासनावर बसल्या आहेत’, असा भाव ठेवून सेवा केल्यावर साधकाला आलेली अनुभूती

श्री. हर्ष गोसावी

‘१५.९.२०२० या दिवशी माझ्याकडे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीच्या स्वच्छतेची सेवा होती. सेवा करण्यापूर्वी मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना प्रार्थना केली. मी सेवा करतांना ‘त्या येथे उपस्थित असून माझ्याकडे पहात आहेत’, असा मी भाव ठेवला. मी सुखासनावरचे (सोफ्यावरचे) ‘कुशन’ झटकून ते व्यवस्थित केले. स्वच्छता पूर्ण झाल्यावर मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बसतात तेथे गेलो, तर कुणी बसल्यावर सुखासनावरील ‘कव्हर’ जसे दिसेल, तसे ते झाले होते. ते पाहून माझी भावजागृती झाली आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

परम पूज्य डॉक्टर, माझी काहीच पात्रता नसतांनाही तुमच्या कृपेने मला महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीच्या स्वच्छतेची सेवा मिळाली आणि तुम्हीच ती परिपूर्ण करून घेतलीत. त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. हर्ष गोसावी (वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.९.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक