नागपूर जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक
नागपूर – येथील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी १६, तर पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी ५ ऑक्टोबर या दिवशी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाची सिद्धता पूर्ण झाली आहे. पोटनिवडणुकीसाठी ६ लाख १६ सहस्र मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १ सहस्र ११५ मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी ७९ उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समित्यांच्या ३१ जागांसाठी १२५ उमेदवार रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे, यासाठी निवडणूक कर्मचारी मतदान साहित्य मतदान केंद्राकडे घेऊन जात आहेत.