पुणे, ३ ऑक्टोबर – राज्य पुरस्कार, गदिमा पुरस्कार प्राप्त झालेले, विनोदी शैलीत लिखाण करणारे लेखक आणि कथाकथनकार, ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांचे पुण्यातील रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मिरासदार यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे १४ एप्रिल १९२७ या दिवशी झाला. महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात घेऊन त्यांनी काही वर्षे पत्रकारिता केली. त्यानंतर ते वर्ष १९६१ मध्ये मराठीचे प्राध्यापक झाले. २४ कथासंग्रह, तर १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या आहेत.