कल्याण, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदूंच्या देवतांची विटंबना करणारे चुकीचे संदेश सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणारा कल्याण (पूर्व) भागातील सिद्धार्थनगर येथील श्रेयस मगर याच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (हिंदूंच्या देवतांची विटंबना करणार्याला कडक शिक्षा झाल्यास पुन्हा देवतांची विटंबना करण्यासाठी कुणी धजावणार नाही. – संपादक)
मागील काही मासांपासून श्रेयस मगर हा सामाजिक माध्यमांवर हिंदूंच्या देवतांची विटंबना होईल, असे संदेश सर्वांना पाठवत होता. त्याने एका छायाचित्रात एक राक्षस एका मुलीवर बलात्कार करत असल्याचे दाखवले आहे. राक्षसाला लाल टिळा लावला असून छायाचित्राखाली ‘जय श्रीराम’ असे लिहिले आहे. अन्य एका छायाचित्रात श्रीरामाची विटंबना करण्यात आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर मगर याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.