संभाजीनगर येथे ‘आधार लिंक’मध्ये सापडली ७ सहस्र ४८६ विद्यार्थ्यांची दोन वेळा नावे !

केंद्रप्रमुखांवर कारवाई करण्याचे आदेश !

संभाजीनगर – शालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी येथील शालेय विद्यार्थ्यांचे आधार लिंक करण्याचे काम चालू असतांना जिल्ह्यातील ७ सहस्र ४८६ विद्यार्थ्यांची नावे २ शाळांत सापडली आहेत. त्यामुळे संबंधित केंद्र प्रमुखांवर कारवाई करावी, असा आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी दिला आहे, तसेच या संदर्भात केंद्र प्रमुखांकडून खुलासाही मागवण्यात आला आहे. पटसंख्या वाढवून शिक्षकांची पदे वाचवण्यासाठी ही बनवाबनवी करण्यात आली आहे. मुलांची दुहेरी नावे असल्यामुळे २५० शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. (आधार ‘लिंक’ करत असतांना सहस्रो विद्यार्थ्यांची नावे २ शाळांत सापडणे गंभीर आणि चिंताजनक आहे. या प्रकरणातून अशाप्रकारच्या अजून कोणत्या चुका आहेत, हेही शोधणे आवश्यक आहे. – संपादक)