चोर सोडून संन्याशाला फाशी देणारे पोलीस !

प्रातिनिधिक छायाचित्र

‘देहली येथील शाहदरा भागात रहाणारी एक महिला आणि तिची भाची यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका धर्मांध तांत्रिकाच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात २ प्रथमदर्शनी माहिती अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवण्यात आले आहेत. धर्मांधाने महिलेचे धर्मांतर केले; मात्र भाचीने धर्मांतराला विरोध केल्याने तिचे धर्मांतर करण्यात त्याला अपयश आले. एका प्रकरणात पीडिता (पीडित महिलेची भाची) अल्पवयीन असल्याने त्यात ‘पॉक्सो’ कायदा लावण्यात आला आहे, तरीही आरोपीला अंतरिम जामीन मिळाला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ‘आरोपीला साहाय्य करण्यासाठी पोलिसांनी तक्रारीमध्ये जाणीवपूर्वक निष्काळजीपणा केला’, असा आरोप पीडितेने केला आहे. (पोलीस पीडितांना साहाय्य करण्याचे सोडून आरोपींना साहाय्य करत असल्यामुळेच समाजात बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असे जनतेला वाटल्यास आश्चर्य नाही ! – संपादक)’ ॐ

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.