‘धिरयो’ (बैलांच्या किंवा रेड्यांच्या झुंजी) रोखण्यासाठी गोवा पोलिसांना मार्गदर्शन करावे लागते, हे पोलिसांना लज्जास्पद !

‘अवैधरित्या करण्यात येणारी गुरांची हत्या आणि आयोजित केल्या जाणार्‍या ‘धिरयो’ (बैलांच्या किंवा रेड्यांच्या झुंजी) यातून मुक्या प्राण्यांना सहन करावे लागणारे हाल रोखण्यासंदर्भात पशूसंवर्धन खात्याने दक्षिण गोव्यातील पोलीस अधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात एक सत्र आयोजित केले होते. या सत्रात दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कटयाल, पशूसंवर्धन खात्याचे अधिकारी डॉ. प्रशांत नाईक आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.’