सिंधुदुर्ग – कोरोना महामारीच्या नियमांचे पालन करून जिल्ह्यात जलक्रीडा प्रकार (वॉटरस्पोर्ट्स ) चालू करण्यासाठी अनुमती देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत २७ सप्टेंबरला घेण्यात आला. याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी लवकरात लवकर काढणार आहेत. ही बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाली.