राज्यपालांनी सांगितलेली स्थिती आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! राज्यपालांनी ‘यासाठी काय करणार ?’, हे सांगणेही जनतेला अपेक्षित आहे !

गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई

‘देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७४ वर्षे उलटली आहेत, तरीही देश नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवू शकलेला नाही. ही त्रुटी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजनबद्धरित्या प्रयत्न करत आहेत’, असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी केले. कदंब पठारावर आयोजित करण्यात आलेल्या एका खासगी कार्यक्रमात राज्यपाल पिल्लई बोलत होते.’