सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला सिमेंटचे रस्ते करण्यासाठी १३० कोटी रुपयांचा निधी मिळावा !

स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांचे निवेदन

केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी (मध्यभागी) यांना निवेदन देतांना निरंजन आवटी आणि अन्य

सांगली, २६ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोना महामारी आणि महापुर यांमुळे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असून विकासकामे करण्यासाठी निधीची कमतरता आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तरी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला सिमेंटचे रस्ते करण्यासाठी १३० कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशा मागणीचे निवेदन केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी दिले. हे निवेदन ते कराड येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता देण्यात आले. या वेळी भाजप आमदार सुधीर गाडगीळ, भाजप आमदार सुरेशभाऊ खाडे, सुरेश आवटी, माजी स्थायी समिती सभापती संदीप आवटी यांसह अन्य उपस्थित होते.