महंत नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूच्या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआय करणार

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या मृत्यूचे अन्वेषण आता केंद्रीय अन्वेषण विभागाला (‘सीबीआय’ला) सोपवण्यात आले आहे. सीबीआयकडून या प्रकरणात एक गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी ६ सदस्यीय पथकाची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाकडून या प्रकरणाची अन्वेषण केले जात होते; मात्र काही संत आणि महंत यांच्याकडून या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआकडून करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.